माझी वसुंधरा अभियानासाठी पालिका सरसावली
माझी वसुंधरा अभियानासाठी पालिका सरसावली
३० मार्चपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
वाशी, ता. ९ (बातमीदार) ः शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये ‘क’ वर्ग महापालिकांमध्ये सर्वोत्तम पर्यावरणशील शहराचा बहुमान नवी मुंबई महापालिकेने पटकावला आहे. यावर्षीच्या अभियानामध्ये अधिक उत्तम कामगिरीसाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे सरसावले असून, त्यांनी कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेताना, कामांना गती द्यावी आणि ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार ३० मार्चपर्यंत कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत.
माझी वसुंधरा अभियानचा आढावा घेताना डॉ. कैलास शिंदे यांनी उद्यान विभागामार्फत ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. तसेच देशी वृक्षरोपांच्या लागवडीवर भर देण्यात यावा, असे सूचित करत नवी मुंबई शहरातील जैवविविधता वाढीस लागावी, या वृक्षारोपण कार्यवाहीचे लक्ष्य विहित कालावधीत पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे आयुक्तांनी निर्देश दिले. त्यामध्ये बांबूच्या लागवडीवर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे सायन-पनवेल हायवेच्या दुतर्फा असलेल्या मोकळ्या जागा तसेच एमआयडीसी क्षेत्रातील वृक्षारोपणावर भर देण्याचे सूचित केले. यामध्ये सीएसआर निधी मिळवून वृक्षराजी वाढीवर भर देण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. वृक्षारोपणाप्रमाणेच उद्यानांमध्ये नर्सरी विकसित करण्याकडे विशेष लक्ष द्यावे तसेच बीज संकलन केंद्रांची संख्याही वाढवावी आणि नागरिकांमध्ये त्याविषयी व्यापक जनजागृती करावी, असे आयुक्तांनी सांगितले, तर स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणालाही महत्त्व देणाऱ्या आपल्या नवी मुंबई शहराचे माझी वसुंधरा अभियानातील मानांकन सतत उंचावत राहील अशा प्रकारे उद्दिष्ट ठेवून कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिले.
................
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा
प्रतिबंध असलेल्या एकल वापराचे प्लॅस्टिक तसेच पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यासोबतच त्याचा वापर रोखण्यासाठी ठोस शोधमोहीम हाती घ्यावी व कारवाईची व्याप्ती वाढवावी, असेही निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या जलसंचय – जलभागीदारी मोहिमेंतर्गत सोसायट्यांना सहभागी करून जलसंचयासाठी सोसायट्यांच्या आवारातच उपाययोजना करण्याबाबत व्यापक स्वरूपात अंमलबजावणी करावी, असे आयुक्तांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

