भारंगी नदीचा प्रवाह मुळपदावर

भारंगी नदीचा प्रवाह मुळपदावर
Published on

शहापूर, ता. ८ (वार्ताहर): शहापूर शहराच्या प्रवेशद्वारावर कळंबे गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या भारंगी नदीचा मूळ प्रवाह अस्तित्वात आणण्यासाठी एका विशेष कृती आराखड्यांतर्गत नदीची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे गतवर्षी जुलैमध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती टळणार आहे.
शहापूर शहराला लागून असलेल्या भारंगी नदीने पूररेषा ओलांडल्याने गतवर्षी रहिवाशांचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांची घरे, दुकाने, गोदामांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. नदीतील गाळ, जलपर्णी तसेच मातीच्या ढिगाऱ्यांमुळे ही परिस्थिती उद्भवली होती. तसेच नदीच्या काठावर केलेल्या काँक्रीटची बांधकामांमुळे नदीचा मूळ प्रवाहही निमुळता झाला होता. यंदा तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, म्हणून या नद्यांच्या पूररेषा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच साफसफाईच्या कामांचा शंभर दिवसांचा कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.
----------------------------------------------
रहिवासी भागाचे नुकसान
भारंगी नदीने यापूर्वी पूररेषा ओलांडल्याची घटना घडली नव्हती, मात्र गतवर्षी पुराचे पाणी गुजरातीबाग तसेच शहापूर शहरातील रहिवासी भागात शिरले. त्यामुळे महसूल विभागाने यंदा भारंगी नदीच्या प्रवाहाची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. या कामाची महसूल उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी पाहणी केली असून, नदीचा प्रवाह मूळपदावर येणार आहे.
------------------------------------
शहापूरमधील भारंगी नदीच्या प्रवाहाची शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत सफाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये या नदीला मोठा पूर आला होता. त्या अनुषंगाने उपाययोजनांची पाहणी केली.
- अमित सानप, महसूल प्रांत, अधिकारी
------------------------------------
फोटो ओळ शहापूर ः नदीप्रवाहात जेसीबीने साफसफाईचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com