गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण

गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण

Published on

कल्याणमध्ये गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : जागतिक महिलादिनानिमित्त शनिवारी (ता. ८) कल्याण-डोंबिवली महापालिकेने नऊ ते १४ वयोगटातील शालेय विद्यार्थिनींना गर्भाशय कर्करोगाला प्रतिबंध करणारी लस देण्यास सुरुवात केली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि रिजेन्सी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेकडील नेतिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे शाळेत मिशन रक्षा या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाअंतर्गत नऊ ते १४ वयोगटातील शाळेतल्या ८४ विद्यार्थिनींना गर्भाशय मुखाची कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात आली.

कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी शालेय विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर ही लस विद्यार्थिनींना देण्यासाठी त्यांच्या पालकांचे संमतीपत्रदेखील घेण्यात आले. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड म्हणाल्या की, आज भारतात बरेचसे मृत्यू हे स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे होत आहेत. सध्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नऊ ते १४ वयोगटातील मुलींसाठी लस उपलब्ध आहे. सीएसआर फंडाच्या माध्यमातून ही लस महापालिकेला उपलब्ध झाली आहे. उपलब्ध लस टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या इतर शाळांमधील शालेय विद्यार्थिनींना दिली जाईल.

महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, वैद्यकीय अधिकारी सुहासिनी बडेकर, डॉ. विनोद दौंड, डॉ. प्रज्ञा टिके व इतर वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा इटकर, आयएमए डोंबिवलीच्या पदाधिकारी डॉ. निती उपासनी, उपायुक्त संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे, शिक्षकवर्ग व मुलींचे पालक आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आशासेविका उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com