

कृष्णा शेलार ः सकाळ वृत्तसेवा
वासिंद, ता. ८ ः शहरात मोकाट कुत्र्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. शहरी भागातून वासिंद परिसरात सोडण्यात येणाऱ्या श्वांनामुळे गेल्या वर्षभरात त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे श्वानांच्या वाढत्या झुंडशाहीचा बंदोबस्त करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे.
वासिंद बाजारपेठ परिसरात मटण, मच्छीच्या दुकानांसमोर तसेच ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांजवळ कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळतात. शहरांत अचानक वाढलेल्या श्वानांमुळे सध्या विविध अडचणींचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागत आहे. वासिंदच्या साईनाथ नगरमध्ये एकाच कुत्र्याने तीन ते चार जणांचा चावा घेतल्याची घटना नुकतीच घडली होती. रात्रीच्यावेळी तसेच दिवसाढवळ्या शाळकरी मुले, दुचाकी चालकांच्या अंगावर श्वान धावून जाण्याच्यादेखील घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे वासिंद ग्रामपंचायतीने शहापूरच्या पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाबाबत वर्षभरापासून पत्रव्यवहार केला होता. त्यावर ग्रामपंचायत स्तरावर नसबंदी किंवा भटक्या श्वानांच्या लसीकरणाच्या सूचना पशुधन अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिल्या आहेत, पण अशी कोणतीही यंत्रणा ग्रामपंचायतीकडे नसल्याने श्वानांच्या बंदोबस्तात अडचणी येत आहेत.
--------------------------------------
तीन महिन्यांत २७० जणांना चावा
मुंबई, नवी मुंबई, ठाणे महापालिकांकडे श्वानांच्या बंदोबस्तासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. वासिंद ग्रामपंचायतीने अशा शहरी भागातील शासकीय यंत्रणेच्या मदतीने शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत शून्य ते अठरा वयोगटातील ४२ जणांना तर १५० पुरुष आणि ७८ महिलांना श्वानदंश झाल्याची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे, मात्र प्रत्यक्षात हा आकडा अधिक असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मोकाट श्वानांची ग्रामस्थांमध्ये दहशत पसरलेली आहे.
-----------------------------------------------
वासिंद ग्रामपंचायतीकडे कुत्रे पकडण्यासाठी यंत्रणा नाही. तसे पत्र पंचायत समिती, गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच शहापूर नगर पंचायत आणि भिवंडी महापालिकेलादेखील कुत्र्यांचे लसीकरण आणि बंदोबस्त करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.
-विशाखा पाटील, ग्रामविकास अधिकारी, वासिंद
़़ः-------------------------------------------------------
एका मुलाला कुत्रा चावल्याने त्याला सरकारी दवाखान्यात नेले होते. तर लस संपल्याचे कारण सांगत शहापूरला पाठवण्यात आले. याबाबत तक्रार केल्यानंतर संध्याकाळपर्यंत लस उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.
- प्रकाश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.