सिपी तलाव डम्पिंगवरील कचऱ्याला आग
सीपी तलाव डम्पिंगवरील कचऱ्याला आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : वागळे इस्टेट परिसरातील वागळे बस डेपोच्या बाजूला असलेल्या ठाणे महापालिकेच्या सीपी तलाव डम्पिंग येथील कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. हा प्रकार शुक्रवारी (ता. ७) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास समोर आला. याचदरम्यान ठाणे पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर जवळपास पावणेतीन तासांनी त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
सीपी तलाव येथील डम्पिंगवरील कचऱ्याला आग लागल्यानंतर ती आग पसरून आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच टीडीआरएफ या विभागांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एक-दोन तास झाला तरी आग नियंत्रणात येत नव्हती. तर ती आग हळूहळू धुमसत होती. आग वाढत असल्याने घटनास्थळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा केल्यानंतर जवळपास ती आग पावणेतीन तासांनी म्हणजे सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात संबंधित विभागांना यश आले. या वेळी तीन फायर वाहनांसह एक जम्बो वॉटर टँकर, चार वॉटर टँकर आणि पाणीपुरवठा विभागाचा एक वॉटर टँकर पाचारण केले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

