

गांजाची तस्करी करणारी महिला अटकेत
चेंबूर, ता. ९ (बातमीदार) ः घाटकोपर परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. अनुराधा म्हात्रे (५५) असे आरोपी महिलेचे नाव आहे. शहरात अमली पदार्थांची तस्करी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी मुंबई शहर व उपनगरांत रात्रीची गस्त सुरू केली आहे. घाटकोपर असल्फा व्हिलेज परिसरात गुरुवारी (ता. ६) रात्री गस्त घालत असताना कलावती चाळ परिसरात एक महिला पोलिसांना संशयास्पद फिरताना आढळून आली. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी पोलिसांनी महिला पोलिसांना पाचारण केले. तिची झडती घेतली असता, तिच्याजवळ पोलिसांना १० हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला आहे. आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.