नवीन शैक्षणिक धोरणातून विकासाला गती मिळणार
नालासोपारा, ता. ९ (बातमीदार) : नवीन शैक्षणिक धोरणातून विकासाला गती मिळणार, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलिस निरिक्षक लालू तुरे यांनी केले. वसई तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी ‘शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण’ हे पाचदिवसीय शिबिर घेण्यात आले होते. त्याचा समारोप महिला दिनानिमित्त शनिवारी (ता. ८) विरार येथील यश विद्या निकेतन स्कूलमध्ये झाला. त्या वेळी ते बोलत होते.
प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संभाजी भोजने, वसई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी माधुरी पाटोळे आणि यश विद्यानिकेतन शाळेच्या प्राचार्या रुचिता ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विरारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लालू तुरे हे उपस्थित होते. त्यांनी उत्तम शिक्षण आणि योग्य प्रशिक्षणामुळे राष्ट्र विकासाला गती मिळते, असे सांगत शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. प्रशिक्षक प्रा. स्वाती जयकर यांनी नवीन शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी आधुनिक स्पर्धात्मक जगातील क्षमता आत्मसात करणे गरजेचे आहे व त्या क्षमता आपल्या विद्यार्थ्यांना गरूडझेप घेण्यास सक्षम करतील, असे प्रतिपादन केले. या वेळी महिला दिनाचे औचित्य साधून महिला शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी शिक्षकांना कार्यमुक्ती प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
नवीन शिक्षण धोरणावर प्रा. विवास खोपकर व प्राचार्या मुग्धा लेले या तज्ज्ञांचे सखोल व प्रेरक मार्गदर्शन झाले. विद्यार्थ्यांसाठी क्षमताधिष्ठित कौशल्य विकसित करण्याचा रोड मॅप प्रशिक्षणात प्रा. प्रज्ञाकिरण वाघमारे, प्रा. महेश पाटील, भक्ती राऊत, संजय चौधरी यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना दिला. शाळेचे मूल्यांकन प्रणाली आणि समग्र प्रगती पुस्तक यावर प्रभावी भाष्य कॅरल रॅाड्रिक्स, चंद्रकांत वीरकर, संघवी ठाकूर यांनी केले. वसई तालुका शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणात समन्वयिका प्रिती राठोड, डॉ. प्रा. महादेव इरकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात प्रश्न निर्मिती व ‘काऊट’ हे विशेष आकर्षण ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

