भाकरीवर महिलांची चित्रे रेखाटत अनोखी मानवंदना

भाकरीवर महिलांची चित्रे रेखाटत अनोखी मानवंदना

Published on

भाकरीवर साकारली महिलांची चित्रे
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : शहरातील दोन कला शिक्षकांनी जागतिक महिलादिनानिमित्त शनिवारी (ता. ८) चपाती आणि भाकरीवर महिलांची चित्रे रेखाटून त्यांना अनोखी मानवंदना दिली. कला शिक्षक यश महाजन यांनी चपातीवर तर कला शिक्षक श्रीहरी पवळे यांनी तांदळाच्या भाकरीवर महिलांचे चित्र रेखाटले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये शनिवारी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील दोन कला शिक्षकांनी आपल्या चित्रकलेच्या सहाय्याने महिलीदिनीच महिलांना मानवंदना दिली.
यातील छत्रपती शिक्षण मंडळाच्या कर्णिक रोडवरील नूतन विद्यालयातले शिक्षक श्रीहरी पवळे यांनी तांदळाच्या भाकरीवर महिलादिनानिमित्त अनोखे चित्र रेखाटले. अनेक भूमिका वठवणारी आणि त्याचबरोबर आपल्या लहान मुलांचे संगोपन करणारी स्त्री त्यांनी भाकरीवर रेखाटत महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या. यासाठी पवळे यांचे कल्याणमध्ये कौतुक केले जात आहे. तर कल्याण पश्चिमेकडील श्री वाणी विद्याशाला हायस्कूलचे कला शिक्षक यश महाजन यांनी सर्व कष्टकरी महिलांना महिलादिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक कष्टकरी महिलांचे प्रातिनिधिक चित्र चपातीवर काढले. याबद्दल महाजन म्हणाले, की समाजाचे ओझे वाहणारी, स्वतःच्या हाताला चटके सोसून सर्वांची भूक भागवणारी अशी आपल्या कष्टकरी महिलेची प्रतिमा आहे. त्यांच्या उपकाराची जाणीव म्हणूनच ॲक्रेलिक रंगांच्या माध्यमातून त्यांचे चित्र चपातीवर काढले. यासाठी मला एक ते दीड तासाचा अवधी लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com