ठाणे बॅडमिंटन अकादमीचा दबदबा
ठाणे, ता. ९ : अबुधाबीमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये खुल्या गटात ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या दीप रांभिया आणि प्रतीक रानडे यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. या जोडीने प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देताना निर्णायक क्षणी खेळाचा स्तर उंचावत यश संपादन केले.
दीप रांभिया आणि प्रतीक रानडे जोडीने उपांत्यपूर्व फेरीत कृष्ण देसाई आणि अमन नौशाद यांच्याविरुद्ध २१-१४, २१-२३, २१-८ असा विजय साकारला. त्यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीत अबिय्यु फौझान माजिद आणि सोमी रोमधानी या इंडोनेशियन खेळाडूंवर चुरशीच्या सामन्यात २१-१४, ७-२१, २१-१३ अशी मात केली. जेतेपदाच्या लढतीत कृष्ण प्रसाद गरगा आणि रवी सजयन या जोडीला २३-२१, २१-१३ असे नमवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या सर्वच खेळाडूंची कामगिरी चांगली आहे.
------------------------
परदेशात खेळण्याचा अनुभव
अथर्व जोशी आणि पार्थिव नायर हे आपले दोन सर्वोत्तम एकेरीतील खेळाडू उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले. क्रिश देसाई आणि अमन नौशाद ही जोडी उपांत्यपूर्व फेरीमध्ये हरली असली तरी खेळाडूंना परदेशात खेळण्याचा अनुभव आल्याचे ठाणे अकादमीचे प्रमुख श्रीकांत वाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

