ठाण्यातील सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : सीपी तलाव येथील कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा आणण्यासाठी विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अशातच या भागात दोन दिवसांपासून घंटागाडी फिरकली नसल्याने शहरातील सोसायट्यांबाहेर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तातडीने हा कचरा उचलला नाही तर पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
वागळे इस्टेटमधील सीपी तलाव परिसरात महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानंतर तो डायघरला टाकला जातो. मात्र केंद्रातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच शुक्रवारी रात्रीपासून कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे केंद्रावर कचरा गाड्या आणण्यास विरोध केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने तोडगा काढण्याऐवजी दोन दिवसांपासून शहराच्या काही भागात घंटागाड्या पाठवणे बंद केले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत सोसायट्यांबाहेर कचरा साचलेला आहे. घंटागाडीच आली नसल्याने साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून, तातडीने हा कचरा उचलण्याची मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.
-----------------------------------------------
रोगराई पसरण्याची भीती
कचरा विल्हेवाट तसेच डम्पिंग प्रश्नावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. राज्य सरकारने डायघर येथे प्रकल्पासाठी जागा दिली; मात्र महापालिका प्रशासन कचरा विल्हेवाटीची यंत्रणा उभारू शकली नाही. सीपी तलाव येथील कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची भीती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

