छ. शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे १७ मार्चला उद्‌घाटन

छ. शिवाजी महाराज यांच्या 
मंदिराचे १७ मार्चला उद्‌घाटन
Published on

छ. शिवाजी महाराज यांच्या
मंदिराचे १७ मार्चला उद्‌घाटन

मराडेपाडे पाडा येथे सोहळ्याला मुख्यमंत्री येणार

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्‍य मंदिर मराडेपाडा येथे उभारण्यात आले आहे. या मंदिराचा उद्‍घाटन सोहळा १७ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त शुक्रवारपासून (ता. १४) चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

१४ मार्चला सकाळपासून मंदिरात विधी पूजा, गो प्रवेश, सामूहिक हरिपाठ, सायंकाळी शक्ती भक्ती शिवसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्चला धर्मध्वज पूजन, मंदिर द्वारप्रवेश, होमहवन, त्यानंतर महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ‘मी वाहिनी होते’ हा कार्यक्रम होणारा आहे. १६ मार्चला विधी व समारंभास प्रारंभ होणार आहे. यामध्ये भव्य ऐतिहासिक प्रदर्शन ‘शिवकालीन ललकार’ हा मराठ्यांच्या इतिहासावर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. १७ मार्चला श्री छत्रपतींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण व कलशारोहण विधी, क्षेत्रपाल पूजन, होमहवन पूर्णाहुती कार्यक्रम संपन्न होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या वेळी अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजूभाऊ चौधरी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com