मोतीलाल नगर रहिवाशांचे म्‍हाडाविरोधात धरणे आंदोलन

मोतीलाल नगर रहिवाशांचे म्‍हाडाविरोधात धरणे आंदोलन
Published on

मोतीलालनगर रहिवाशांचे म्‍हाडाविरोधात धरणे आंदोलन
मुंबई, ता. ९ : गोरेगावात मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प राबवताना म्हाडा मनमानी कारभार करीत असल्याच्या निषेधार्थ आज (ता. ९) मोतीलालनगरच्या रहिवाशांनी धरणे आंदोलन केले.
जनकल्याणकारी समिती, मोतीलालनगर रहिवासी विकास संघ, मोतीलालनगर पुनर्विकास समिती यांच्या तर्फे हे आंदोलन करण्यात आले. नवीन घरांच्या चाव्या दिल्या तरच आम्ही जुन्या घरांचा ताबा देऊ. आम्ही पुनर्वसन शिबिरात जाणार नाही. मोतीलालनगरमध्ये उपलब्ध असलेल्या मोकळ्या मैदानात नवीन घरे बांधावीत. दोन हजार चौरस फूट क्षेत्रफळाची नवी घरे मिळावीत. त्यात सर्व आधुनिक सोयी-सुविधा असाव्यात, २५ लाख रुपये कॉर्पस फंड मिळावा, प्रत्येक घराला दोन वाहनतळ मिळावेत, धार्मिक स्थळांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे, अशा रहिवाशांच्या मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com