पोटच्या मुलीवर
वडिलांचा अत्याचार

पोटच्या मुलीवर वडिलांचा अत्याचार

Published on

टिटवाळ्यात पोटच्या मुलीवर
वडिलांचा अत्याचार
टिटवाळा, ता. ९ (वार्ताहर) : वडिलांनीच आपल्या मुलीवर सहा वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार टिटवाळा येथे उघडकीस आला आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. टिटवाळा पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. आरोपी हा रेल्वेमध्ये उच्चपदावर कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलगी वयाच्या १६ व्‍या वर्षांपासून या नरकयातना सहन करत होती. पत्नी आणि मुलीला सातत्याने मारहाण करून जीवे मारण्याच्या धमकीने हा अत्याचार सुरू होता. या मुलीवरील सुरू असलेल्या या अत्याचाराची माहिती एका सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या कार्यकर्तीकडे पोहोचताच तिने या प्रकरणाला वाचा फोडली. तिच्या मदतीने टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या विकृताला पोलिसांनी शनिवारी रात्री ११ वाजता अटक केली. आरोपी हा रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकारी आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मुलगी आणि बापाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com