श्री दत्त विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन
तुर्भे, ता. १० (बातमीदार) : सानपाडा येथील नवी मुंबई महापालिकेच्या श्री दत्त विद्या मंदिरच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक विभागातील स्नेहसंमेलन होत असलेली एकमात्र शाळा म्हणजे सानपाडा येथील श्री दत्त विद्या मंदिर. जिल्हा परिषद ते नवी मुंबई महापालिका असा प्रवास असलेल्या शाळेला ७३ वर्षे पूर्ण झाली. १९५२ साली तत्कालीन सरपंच काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून शाळेची उभारणी झाली. सर्व सोयींनी युक्त प्रशस्त स्वरूपाची असलेली ही शाळा नवी मुंबई स्तरावर शैक्षणिक, क्रीडा, विज्ञान, सांस्कृतिक व स्वच्छतेत अग्रस्थानी आहे. सानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास कठाले यांनी स्नेहसंमेलनास उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करून शाळेचे कौतुक केले. कार्यक्रमात या वर्षी दहावी शालान्त परीक्षेत नवी मुंबई स्तरावर प्रथम आलेली पूजा वंजारे हिचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून बंगळूरला विमान प्रवास करून परतलेल्या चार विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

