निवृत्त शिक्षक आणि आदर्श माता कृतज्ञता समारंभ

निवृत्त शिक्षक आणि आदर्श माता कृतज्ञता समारंभ
Published on

निवृत्त शिक्षक आणि आदर्श माता कृतज्ञता समारंभ
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिम पारसीवाडी येथील अभ्युदय विद्यालयात जागतिक महिलादिनानिमित्त आदर्श माता गौरव आणि मातृ पाद्यपूजन सोहळा तसेच निवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. मुंबईसारख्या गतिमान नगरीत संघर्ष आणि काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना शिक्षण देणाऱ्या मातांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य रुजवण्याच्या हेतूने जन्मदात्या आईचे पाय धुवून पूजा करण्याचा भावनिक असा मातृ पाद्यपूजन सोहळा पार पडला. या वेळी विद्यालयातून निवृत्त झालेल्या प्रल्हाद पवार आणि सूर्यभान गव्हाणे या शिक्षकांची ढोल-ताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढून त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आर जी हुले यांच्या मार्गदर्शन आणि संकल्पनेतून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com