

वाशी, ता. १० (बातमीदार) : प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून नागरिकांनी कापडी पिशव्यांचा पर्याय स्वीकारावा, याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात आहे. यादृष्टीने रविवारी (ता. ९) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आठही विभागांत राबविण्यात आलेल्या मोहिमांमध्ये एक लाख ६५ हजार दंड वसूल करून ७१.६ किलो प्लॅस्टिक पिशव्या व एकल वापर प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
नवी मुंबई महापालिकेने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली परिमंडळ १चे उपायुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २चे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ १चे उपायुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ २चे उपायुक्त संतोष वारुळे यांच्या माध्यमातून सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त, स्वच्छता अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यापुढील काळातही अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक वापर शोधमोहिमा नियमितपणे राबविल्या जाणार आहेत. या माध्यमातून विक्रेत्यांना समज मिळण्यासोबतच नागरिकांनीही एकल वापर प्लॅस्टिकचा वापर टाळावा, याबाबतची जागरूकता केली जात आहे.
------------------
पालिकेने वॉर्डनिहाय केलेली कारवाई
प्रभाग प्लॅस्टिक (किलो) दंड (रु)
बेलापूर ६ ४
नेरूळ १० ३०
वाशी १२ ३०
तुर्भे २५ १०
कोपरखैरणे ५ १५
घणसोली ९ २०
ऐरोली ४ १०
दिघा ६००(ग्रॅम) १०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.