कल्याण-मुरबाड रस्त्यावर धोका
मुरबाड, ता.१० (बातमीदार)ः कल्याण-मुरबाड रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने येथे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. जुन्या रस्त्यावरील डांबराचा थर काढून टाकल्याने वाहने चालवणे जिकिरीचे झाले असून रस्त्यावरील उडणारी धुळीने अपघाताचा धोका वाढला आहे.
कल्याण-मुरबाड रस्ता रुंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी डम्परमधून मातीची वाहतूक केली जात आहे. पण त्यांना आच्छादने नसल्याने सर्वत्र धुळीचे राज्य असल्याने परिसरातील लोकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. प्रशासनाकडून रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी टँकरद्वारे पाणी मारले जात आहे. मात्र, त्यामुळे होणाऱ्या चिखलातून वाहनचालवताना चालकांची तारांबळ उडत आहे.
----------------------------
सुट्टीच्या दिवशी वाहनांच्या रांगा
मुरबाड एसटी स्टँडच्या समोर उड्डाणपुलाचे काम चालू आहे. त्यामुळे शहापूर दिशेकडे जाणारी वाहतूक औद्योगिक वसाहतीकडून वळवण्यात आली आहे. या वळण रस्त्यामुळे म्हसा-कर्जत मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी होत आहे. तसेच शनिवारी-रविवारी माळशेज घाटाकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहनांची संख्या वाढत असल्याने या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत.
------------------------------------------------
मुरबाड रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी वाहतूक केली जाणारी खडी, माती झाकणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यावर एकाच वेळी पाणी टाकून चिखल करण्यापेक्षा थोडा थोडा वेळाने पाणी शिंपडणे गरजेचे आहे.
- किशोर गायकवाड, वकील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

