विनोद पाटील तालुका कार्याध्यक्ष

विनोद पाटील तालुका कार्याध्यक्ष

Published on

विनोद पाटील तालुका कार्याध्यक्ष
वज्रेश्वरी (बातमीदार): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी तालुका ग्रामीणच्या कार्याध्यक्षपदी विनोद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असताना नुकताच त्यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) भरत गोंधळे यांनी कल्याण येथील पक्ष कार्यालयात विनोद पाटील यांना भिवंडी तालुका ग्रामीणच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिले आहे. यावेळी भिवंडी ग्रामीणचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, प्रदेश कार्याकारणी सदस्य रवींद्र परटोले, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर शेळके, संघटक पार्थ पठारे, आदेश पाटील आदी उपस्थित होते. भिवंडी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस घरोघरी पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com