बीएनएन महाविद्यालयात पाण्यावर चर्चा

बीएनएन महाविद्यालयात पाण्यावर चर्चा

Published on

भिवंडी (वार्ताहर)ः ‘पाणी’हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यावर परिसंवादातून विचार मंथन झालेच पाहिजे, असे प्रतिपादन बी.डी.काळे यांनी केले. बीएनएन महाविद्यालयात ८ मार्च रोजी ‘पाणी’ या विषयावर झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. बीएनएन महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व आय.क्यू ए.सी.च्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन लेखक तथा मानसशास्त्रीय शल्यचिकित्सक बाजीराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. पाण्याशिवाय मासे जगू शकत नाही, मग माणूस कसा जगू शकतो. पाण्याचे महत्त्व आपल्याला कळले आहे, पण ते वळत नसल्याने यावेळी पाटील म्हणाले. या परिषदेचा समारोप राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण सावंत, मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख सचिन लबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com