बदाम ठेवतात रक्तातील साखर नियंत्रणात

बदाम ठेवतात रक्तातील साखर नियंत्रणात
Published on

बदाम ठेवतात रक्तातील साखर नियंत्रणात
अभ्यासाचा निष्कर्ष; दररोज मूठभर बदाम शरीर ठेवतील सुदृढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : दररोज मूठभर बदामाच्या सेवनाने शरीर सुदृढ राहण्यास मदत होते, पण बदामाचा सर्वाधिक फायदा हा मधुमेह असलेल्या लोकांनाही होतो. बदामात रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असल्याचा अहवाल समोर आला आहे. ‘कॅलिफोर्निया बदाम’ या संस्थेने भारतात केलेल्या संशोधनात बदामाचे शारीरिक फायदे यावर भर दिला आहे.
मधुमेह असलेल्या लोकांसाठी बदामाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करण्याची क्षमता. अभ्यासातून स्पष्ट झाले की, बदाम खाल्ल्याने उपवासाच्‍या वेळेतील इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळी कमी होते. प्रथिने, निरोगी फॅट आणि फायबर यांचे मिश्रण पचन मंद करते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध होतो.
भारतात रक्तातील साखरेचे प्रमाण चिंताजनक जास्त आहे. १०१ दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त असून, १३६ दशलक्ष लोक पूर्वमधुमेहाने ग्रस्त आहेत. भारतीयांना पूर्वमधुमेहापासून टाइप दोन मधुमेहापर्यंत जाण्याचा धोका इतर गटांच्या तुलनेत जास्त आहे. या सर्व परिस्थितीवर दररोजच्या बदाम सेवनातून मात करता येऊ शकते.
बदामात हळूहळू पचणारे फायबर, वनस्पती प्रथिने, चांगले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी असते. त्यामुळे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम हा उत्तम पर्याय आहे.
कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक बदामांची शेती केली जाते. डिसेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी बदामांसाठी महत्त्वाचा असतो. बदामांच्या छोट्या आणि २० ते ३० वर्षे जुन्या झाडांना मोठ्या प्रमाणात बहर येतो. या संस्थेने भारतातील महत्त्वाच्या प्रतिनिधींसाठी टूर आयोजित केली होती. या तीन दिवसांच्या समिटमध्ये त्यांनी बदामांचे शारीरिक फायदे अधोरेखित केले. भारतातील लोकांना मधुमेहाचा खूप मोठा धोका आहे, असे ‘कॅलिफोर्निया बदाम’च्या सहयोगी संचालक एलिना हेमलर यांनी सांगितले.

भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर
मधुमेहाच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमाकांवर चीन आहे. नाश्ता, दोन वेळच्या जेवणापूर्वी २० ग्रॅम बदामाचे सेवन केल्यास शारीरिक वजन, बीएमआय, चरबी, उपवासातील ग्रुकोज, इन्सुलिन नियंत्रण ठेवण्यास मदत होते. बदामाच्या सेवनातून एक चतुर्थांश नागरिकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण पूर्ववत झाले. त्यामुळे दैनंदिन जीवनात मूठभर बदाम फार महत्त्वाचे आहेत, असे ‘कॅलिफोर्निया बदाम’ या संस्‍थेने आपल्‍या अहवालात म्‍हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com