कौस्तुभ सोनवणे यांची ‘इस्रो’त नियुक्ती
कौस्तुभ सोनवणे यांची ‘इस्रो’त नियुक्ती
पेण, ता. १० (वार्ताहर) : शहरातील देवनगरी सोसायटी येथे राहणारा कौस्तुभ प्रभाकर सोनवणे याची श्रीहरीकोटामधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत सतीश धवन अंतराळ केंद्रात नियुक्ती झाली आहे. सामान्य कुटुंबातील कौस्तुभने अथक परिश्रम करीत इथपर्यंत मजल मारली आहे. त्याचे वडील प्रभाकर शासकीय आरोग्यसेवेत कार्यरत असून आई गृहिणी आहेत. कौस्तुभने आयआयटी धनबाद येथून मास्टर ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरींमध्ये एम.टेक. पदवी संपादित केली आहे. त्याचे प्राथमिक शालेय शिक्षण पेण येथील महिला शिक्षण समिती संचलित सुबोध विद्यालयात पूर्ण झाले आहे. त्याने शासकीय तंत्रनिकेतन येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्याची आरसीएफ कंपनी थळ, अलिबाग येथे मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून निवड झाली होती. आता त्याला इस्रो अवकाश संशोधन संस्थेत संधी मिळाल्याने सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
पेण ः
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

