सायन स्‍थानकाजवळील मासळी बाजार जमीनदोस्‍त

सायन स्‍थानकाजवळील मासळी बाजार जमीनदोस्‍त

Published on

सायन स्‍थानकाजवळील मासळी बाजार जमीनदोस्‍त
पालिकेच्या ग उत्तर विभागाची कारवाई
धारावी, ता. १० मार्च (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या शीव स्थानकाजवळील केला वखार येथील गेल्‍या अनेक वर्षांपासून असलेला मासळी बाजार पालिकेच्या ग उत्तर विभागातर्फे शुक्रवारी (ता. ७) जागतिक महिलादिनाच्या पूर्वसंध्येला निष्कासित करण्यात आला. त्‍यामुळे मासळी विकणाऱ्या महिला अक्षरशः रस्त्यावर आल्या आहेत. त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.
धारावीतून सायन रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास ४० वर्षांपासून मासळी विकण्याचा व्यवसाय महिला करतात. यातील अनेक महिलांच्या सासू अथवा घरातील वरिष्ठ महिलांनी हा व्यवसाय येथे सुरू केला होता. त्या वेळी कोणतीही आडकाठी झाली नव्हती. त्यामुळे महिला निर्धास्तपणे मासळी विकत होत्या. मात्र पालिकेने मासळी बाजार हटवल्याने मासळी विक्रेत्या महिला अडचणीत आल्या आहेत.
आम्ही गेल्‍या अनेक वर्षांपासून मासळी विक्रीचा व्यवसाय करीत आहोत, तरीही पालिका आम्हाला अधिकृत मानत नाही. त्यामुळे आमची ससेहोलपट होत असल्याचे सीता कांबळे यांनी सांगितले. लाल बहादूर शास्त्री मार्गावर मच्छी घेण्यासाठी ग्राहक येतील का, असा सवाल मच्छिविक्रेत्‍या महिलांसमोर उभा राहिला आहे.

वाहतूक पुलासाठी अडचण
सायन स्थानकासमोरील वाहतूक पूल तोडण्यात येत आहे. हा पूल तोडताना हा मासळी बाजार अडचणीचा ठरत असल्याने पालिकेतर्फे ही कारवाई केली गेल्याचे समजते. सायन स्थानकासमोरील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पदपथावर व्यवसाय करण्याचा सल्ला पालिकेने दिला असल्याचे सीता कांबळे, अनिता जाधव या मासळी विक्रेत्या महिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com