

विनापरवाना मोर्चा काढणाऱ्या २५ जणांवर गुन्हा
कळवा (बातमीदार) : सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. के. फौजी यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ मुंब्र्यातील दारुल फलाह अमृतनगर मंगळवारी (ता. ४) हातात झेंडे, बॅनर घेत सार्वजनिक रस्त्यावर विनापरवानगी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भाजप सरकार व पंतप्रधान मोदींविरोधात घोषणा दिल्या. तसेच शांततेचा भंग व अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी सरफराज शेख, शाहरुख खान, मोहम्मद तन्वीज, मोहम्मद शेख, गुफारान अन्सारी, अजमल अल्ताप, आफिक शेख तसेच इतर सात महिला व २५ पुरुषांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
..............
व्यवसायाच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला
कळवा (बातमीदार) : मुंब्र्यातील व्यावसायिक अस्लम शेख व त्यांचे नातेवाईक मोहम्मद शेख यांचा मुंब्र्यात व्यवसाय आहे. त्यांचा आरोपी तब्बो उर्फ तबरेज अन्सारी व अफाफ अन्सारी यांच्याबरोबर व्यवसायातून मंगळवारी (ता. ४) सायंकाळी वाद झाला. या वादातून सहा जणांनी इतर अनोळखी व्यक्तींना घेऊन बांबू, चाकू, चॉपर व लोखंडी रॉडने अस्लम शेख व मोहम्मद शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच मोहम्मद यांची पत्नी साजिदा हिला शिवीगाळ केली. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी आरोपी तब्रेज अन्सारी, अफाफ अन्सारी, जाफर, मोमिन, शाकीर, मोनिस व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
..................
मुंब्र्यात फेरीवाल्याला मारहाण
कळवा (बातमीदार) : रस्त्यावर धंदा करून दादागिरी करतो, या रागातून चौघांनी व त्यांच्या पत्नीसह एकत्र येत फेरीवाल्याला मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता. ५) दुपारी घडली. यासंदर्भात मुंब्रा पोलिसांत चार जणांविरोधात तक्रार दाखल केली असून, या मारहाणीसंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. मुंब्र्यातील तब्रेज अन्सारी या मुंब्रा-कौसा या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला कपडे विकण्याचा व्यवसाय करतात. आरोपी झाकीर शेख सलमान शेख, इमरान, अस्लम, फैजल यांनी जुन्या वादातून तब्रेज व त्याचा भाऊ परवेजला बांबू व स्टीलच्या रॉडने मारहाण करून जखमी केले.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.