कोपरीत २० लाखांचे कोकेन जप्त
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांची अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या परदेशी नागरिकांवरील कारवाई सुरूच असून, शनिवारी (ता. ८) रात्री एपीएमसी पोलिसांनी कोकेन विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आणखी दोन परदेशी नागरिकांची धरपकड केली आहे. इफेनी उजोमा औसोंडू (५६) व साजींनी मेमोरि गामा (४९) अशी या दोघांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल २० लाख ६५ हजार रुपये किमतीचे ५१.६४ ग्रॅम वजनाचे कोकेन हे अमली पदार्थ जप्त केले आहे.
एपीएमसी पोलिस ठाण्यातील पथक कोपरी गाव परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना, पोलिसांना नायजेरियन नागरिक इफेनी उजोमा औसोंडु व दक्षिण आफ्रिकेतील साजींनी मेमोरि गामा ही महिला संशयास्पदरित्या कोपरी गावात वावरताना निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांची गाडी पाहिल्यानंतर ते लगबगीने कोपरी गावातील मराठी शाळेलगतच्या इमारतातीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसले. पोलिसांना या दोघा परदेशी नागरिकांचा संशय आल्याने त्यांनी या दोघांचा पाठलाग करून त्यांचा फ्लॅट गाठला. त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतल्याने पोलिसांनी त्यांना दरवाजा उघडण्यास भाग पाडले; मात्र त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याजवळ असलेले कोकेन किचनमध्ये लपवून ठेवले.
-------------
मिक्सरच्या भांड्यात सापडला मुद्देमाल
पोलिसांनी औसांडु व गामा राहत असलेल्या घरातील किचनची तपासणी केली असता, त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये लपवून ठेवलेले तब्बल २० लाख ६५ हजार रुपये किमतीचे ५१.६४ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याजवळ सापडलेले कोकेन जप्त केले आहे. न्यायालयाने या दोघांची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) महेश मांडवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर शिवूरकर, पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक व त्यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

