अनधिकृत झोपडपट्टीवर रेल्वेचा हातोडा

अनधिकृत झोपडपट्टीवर रेल्वेचा हातोडा

Published on

अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : कल्याण ते कर्जत तिसऱ्या चौथ्या मार्गिकेच्या कामात अडथळा ठरत असणाऱ्या झोपडपट्टीवर अंबरनाथमध्ये कारवाई करण्यात आली. या वेळी पूर्वेला असणाऱ्या १००हून अधिक झोपडपट्ट्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कल्याण ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्याचे कामही सुरू आहे. यासाठी अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रेल्वेला लागून असणाऱ्या झोपडपट्ट्या; तसेच रेल्वेच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांना हटवण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. दरम्यान, मुंबई डिव्हिजनच्या अंतर्गत येणाऱ्या अंबरनाथ पूर्व रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन रुळाला लागूनच मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपडीपट्टी आहे. या झोपडपट्टीवर सोमवारी (ता. १०) सकाळी ११ वाजल्यापासून कारवाई सुरू करण्यात आली. दोन वर्षांपूर्वीच या झोपडपट्टीतील रहिवाशांना जागा रिकामी करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. तसेच, त्यांचे शहाड येथे पुनर्वसनही करण्यात आले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेमध्ये अडथळा ठरत असलेल्या या झोपडपट्टीवर अखेर रेल्वे प्रशासनाकडून आज तोडक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी शंभरहून अधिक झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला. यामध्ये काही घरे, दुकाने, भंगार व्यवसाय करणाऱ्यांचाही समावेश आहे. तोडक कारवाई दोन दिवस सुरू राहणार आहे. कारवाई वेळी मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. कारवाई वेळी अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश पाटील, रेल्वे पोलिस अधिकारी सोनाली नंदेश्वर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, तसेच आरपीएफ पोलिस, जीआरपी पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com