भिवंडीतील रस्त्यांवर सभागृहात चर्चा

भिवंडीतील रस्त्यांवर सभागृहात चर्चा
Published on

भिवंडी, ता. १० (वार्ताहर)ः भिवंडी-वाडा तसेच खारबाव-चिंचोटी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सोबतच या ठिकाणी सुरू असलेले कामे संथ गतीने होत असल्याने सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे अर्धवट असलेल्या कामांचा लेखाजोखा सभागृहात मांडणार असल्याचा इशारा भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिला आहे.
भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला आहे. त्याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३०० कोटी मंजूर केले होते. दरम्यानच्या काळात रस्ते दुरुस्तीसाठी ७५ कोटी खर्च केले जात आहेत, पण दुरुस्तीसोबतच नव्या ठेकेदाराने काम सुरू केल्याने यंत्रणेचा गोंधळ उडाला आहे. या मार्गावरील २० किलोमीटरचा रस्ता खोदण्यात आला आहे, तर टोलवसुली करणारा ठेकेदार न्यायालयात गेल्याने खारबाव-चिंचोटी रस्त्यासाठी ३५० कोटींचा निधी मंजूर असून, काम सुरू झालेले नाही.
-------------------------------------------
वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल
भिवंडी-वाडा रस्त्यावरील अवजड वाहतूक शहरातून जात असल्याने शेलार, नदीनाका, वंजार पट्टी नाका परिसरात दररोज वाहतूक कोंडी होते. या मार्गावरील विश्वभारती फाटा ते भिनार दरम्यानचा बाह्यवळण रस्ता बनवणे गरजेचे आहे. तसेच कवाड येथे कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने भिवंडी ग्रामीणमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com