श्रमजीवी संघटनेचा आजचा मोर्चा स्थगित

श्रमजीवी संघटनेचा आजचा मोर्चा स्थगित

Published on

शहापूर, ता.१० (बातमीदार): तालुक्यातील एकूण ७४ पाड्यांच्या गावठाण जागेच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेकडून वनविभागाच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार होता. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार असल्याचे आश्वासन वनविभागाने दिल्याने मंगळवारी (ता.११) होणारे श्रमजीवी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
आदिम आणि आदिवासी बांधवांना शासनाकडून मंजूर असलेले घरकुल बांधण्याकरिता गावठाण शिल्लक नसल्याने शासन परिपत्रक २ फेब्रुवारी २०२४ प्रमाणे गृह निर्माण करिता गावठाण देण्याची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे श्रमजीवी संघटनेने शहापूर तालुक्यामध्ये ७४ आदिवासी पाड्यांचे अर्ज केले होते. या अर्जांवर ग्रामपंचायतीकडून वन विभागाकडे वन हक्क कायदा कलम ३(२) प्रमाणे प्रस्ताव दाखल केले होते. आदिम आदिवासी समाजाला गावठाण देण्याकरिता २३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु, वनविभागाने कुठलाही प्रकारचे कार्यवाही केली नसल्याने श्रमजीवी संघटनेने मंगळवारी शहापूर उपवन संरक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात सोमवारी शहापूर तालुका श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली.
------------------------------------------
सहा दाव्यांचे प्रस्ताव पाठवणार
शहापूर तालुक्यातील एकूण ७४ पाड्यांच्या गावठाण मागणीपैकी वेडवहाळ, टहारपूर, भावसे, उंबरमाळी, टेंबरे कातकरवाडी व बोरशेती येथील ६ दाव्यांचा प्रस्ताव शुक्रवारपर्यंत पाठवले जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच गावठाण देण्यासंदर्भात शासनाकडून कार्यप्रणाली प्राप्त झाल्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केल्याचे श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र म्हसकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com