करदात्यांच्या वाट्याला पाणीटंचाई
भिवंडी, ता. १० (बातमीदार) : शहरातील बेकायदा इमारतींमध्ये नियमित पाणीपुरवठा होत आहे, पण नियमित कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना मात्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचा आरोप केला जात आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात १,८९२ बेकायदा इमारतींचे बांधकाम झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी अनेक इमारतींमध्ये कुटुंबे राहत असल्याने त्यांना पालिकेकडून नियमित पाणीपुरवठा केला जात आहे, मात्र बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांकडून मालमत्ता तसेच पाणीपुरवठा कर भरला जात नाही, तर काही इमारतींवर शास्तीदेखील आकारण्यात आलेली नाही. त्यांच्याकडून सेवेसाठीचा कर फक्त आकारला जात आहे, पण अशा इमारतींच्या कर पावतीवर बेकायदा बांधकामाची कोणतीही नोंद पालिका अधिकाऱ्यांकडून केली जात नाही. याबाबत अनेकांनी पालिकेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे, शहरात शेकडोच्या संख्येने अशा बेकायदा इमारतीमध्ये पाणीपुरवठा केला जात असून, प्रभाग अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नियमित कर भरणाऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यातही पालिका अपयशी ठरली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
जबाबदारी झटकण्याचे प्रकार
भिवंडी महापालिका क्षेत्रात १८९२ बेकायदा इमारतीची नोंद झालेली आहे. त्यापैकी काही इमारतींची प्रकरणे न्यायालयात आहेत, तर इतर इमारतींवर कारवाई सुरू असल्याचे भिवंडी महापालिकेचे शहर विकास अधिकारी अरविंद घोगरे यांनी सांगितले, तर भिवंडी पालिकेच्या जलवाहिनींमधून थेट पाणीचोरी करणाऱ्यांवर पालिकेच्या भरारी पथकाकडून कारवाई केली जाते, मात्र शहरातील बेकायदा इमारतीमधील पाणीचोरीवर प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे, असे पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी संदीप पटनावर यांनी म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेतील दोन विभागांकडूनच जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

