

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : महापालिकेचे माजी आयुक्त दिलीप ढोले यांच्याविरोधात विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात लक्षेवधी सूचना उपस्थित झाली आहे. ते महापालिकेत कार्यरत असताना झालेली अनेक कामे अनियमित आणि नियमबाह्य असल्याचा आक्षेप घेत आमदार नरेंद्र मेहता यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली आहे. त्यावर राज्य सरकरकडून यासंदर्भातली कागदपत्रे महापालिकेकडून मागविण्यात आली आहेत.
दिलीप ढोले हे २०२१ ते २०२३ यादरम्यान सुमारे अडीच वर्षे मिरा-भाईंदर महापालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांच्याविरोधातील ईडी नोटिशीचे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांची महापालिकेतून तडकाफडकी बदली करण्यात आली. आता त्यांच्या कालावधीतील कामकाजावर आक्षेप घेतला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी लक्षवधी सूचनेत दिलीप ढोले यांच्या कार्यकालातील अनेक कामे अनियमित व नियमबाह्य झाल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने नवीन इमारत बांधकाम परवानग्या देताना नियमांचे उल्लंघन करणे, रुग्णालय आरक्षित भूखंड नियमबाह्य पद्धतीने विकसकाला देणे, पालिकेच्या राखीव निधीच्या मुदत ठेवी नियमबाह्य पद्धतीने मोडून त्या पैशातून ठेकेदारांची देयके देणे, नाट्यगृह उभारणीकरिता विकसकाला नियमबाह्य पद्धतीने टीडीआर देणे, धूळ नियंत्रक वाहने व अग्निशमन विभागात नियमबाह्य बुलेट खरेदी करणे, नियमबाह्य पद्धतीने होर्डिंग निविदा प्रसिद्ध करून महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान करणे आदी विविध मुद्दे मेहता यांनी नमूद केले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची आवश्यकता व ढोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईवर सरकारची प्रतिक्रिया मेहता यांनी या सूचनेद्वारे मांडली आहे. यानुसार कागदपत्रे तातडीने सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिकेला दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.