सरकारी कर्मचारी संपावर
अलिबाग, ता. १० (वार्ताहर)ः प्रलंबित मागण्यांबरोबरच जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद इमारतीसमोर सोमवारी कर्मचाऱ्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसह जुन्या पेन्शन योजनेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याकडे वेळोवेळी सरकारचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे रायगड जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना दिले.
कंत्राटदाराचे धरणे
राज्यातील कंत्राटदारांच्या मागण्यांकडेही सरकार दुर्लक्ष करीत आहे. केलेल्या विकासकामांची देयके न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या रायगड शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कंत्राटदार महासंघाच्या वतीने १४ जानेवारीला आपल्या विविध मागण्यांसह देयके देण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आदींना देण्यात आले होते, मात्र अद्याप कोणताही निर्णय अथवा कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी कंत्राटदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. कंत्राटदार महासंघाकडून जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदनही देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

