स्वाक्षरी मोहिमेतून डम्पिंग ग्राऊंडला विरोध

स्वाक्षरी मोहिमेतून डम्पिंग ग्राऊंडला विरोध
Published on

नालासोपारा, ता. १० (बातमीदार) : वसई-विरार महापालिका हद्दीतील प्रस्तावित डम्पिंग आणि मलनिस्सारणच्या जागेसाठी नागरिकांचा विरोध वाढत आहे. नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसरातील हे आरक्षण पालिकेने हटवावे, या मागणीसाठी भाजपने सोमवारी (ता. १०) जूचंद्र गाव नाक्यावर स्वाक्षरी मोहीम राबवली. या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देत स्वाक्षरी करत आरक्षणाला विरोध दर्शविला आहे.

नायगाव पूर्वला जूचंद्र गावाशेजारी आणि नायगाव कॉलनीशेजारी सर्व्‍हे क्र. २५१ ते २५६, २६७, २०९, ३२५ वर डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी प्रकल्पासाठी ही जागा महापालिकेने आरक्षित केली आहे. ही जागा गावातील लोकवस्तीशेजारी असल्याने भविष्यात स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेने हे आरक्षण रद्द करावे, म्हणून जूचंद्रच्या नाक्यावर भाजपचे जिल्हा सचिव प्रवीण गावडे आणि धीरेंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबविली. अनेक लोकांनी सह्या करून आपला निषेध व्यक्त केला. तसेच नायगाव स्थानक येथे सह्यांची मोहीम राबवणार असल्याची माहिती गावडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com