धुळवडीवर साध्या वेशातील पोलिसांचे लक्ष

धुळवडीवर साध्या वेशातील पोलिसांचे लक्ष

Published on

धुळवडीवर साध्या वेशातील पोलिसांचे लक्ष

कल्याण, ता. १० (बातमीदार) : होळी आणि धुळवड या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सणाच्या काळात कायदा व सुवव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विशेष काळजी घेणार आहेत. तसेच ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलिस परिस्थितीवर नजर ठेवणार आहेत.

होळी-धुळवड अत्यंत जल्लोषात साजरा केला जाणार सण आहे. या दोन्ही सणांना आबालवृद्ध रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येत धम्माल करताना दिसतात. लहान मुलांचा आनंदसुद्धा गगनात मावेनासा असतो, मात्र या काळात अनेक जण धुडगूस घालून किंवा अनुचित प्रकार करून रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न करतात. अशा अनेक घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली परिसराकडे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ-३ चे विशेष लक्ष राहणार आहे. यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसांना काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत.

समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह माहिती पोस्ट करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. शस्त्रांद्वारे कायदा व सुवव्यवस्था धोक्यात आणणाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसेच लोकांच्या इच्छेविरुद्ध रंग टाकणे, रंगांचे फुगे मारणाऱ्यांवरही होणार कारवाई होणार आहे.

पोलिसांची गस्त वाढवणार
काळ्या काचा लावून चार चाकी वाहनांमध्ये फिरणाऱ्यांवर लक्ष असणार आहे. महिलांशी असभ्यपणे वागणाऱ्यांवर तत्काळ कारवाई होणार. तसेच मारहाण, दमदाटी करणाऱ्यांना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलिसांची गस्त वाढणार असून, साध्या वेशातील पोलिस सक्रिय राहणार आहेत.


होळीचा सण सर्वांनीच आनंदात साजरा करावा. या काळात पोलिसांचे अशांतता पसरवणाऱ्यांवर बारीक लक्ष असेल. साध्या वेशातील पोलिस ठिकठिकाणी परिस्थितीवर नजर ठेवणार आहेत.
-अतुल झेंडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ- ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com