बालकाचे अपहरण करणाऱ्या महिलेचे उघडे पडले पितळ
बालकाचे अपहरण करणाऱ्या महिलेचे उघडे पडले पितळ
प्रियकराशी संसार ताटण्यासाठी डाव
वसई/नालासोपारा, ता. १० (बातमीदार) ः प्रियकरपासून गरोदर राहिल्याचे भासवत एका तीन महिन्यांच्या बालकाचे फेब्रुवारी महिन्यात अपहरण करणाऱ्या महिलेचे पितळ उघडे पडले आहे. ही ३६ वर्षांची विवाहित महिला १८ वर्षांच्या प्रियकरासोबत संसार थाटायची स्वप्न पाहत होती; मात्र मांडवी पोलिसांनी तिला बिहार राज्यातून अटक करून अपहृत बालकाचीही सुखरूप सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई येथील नालेश्वरनगर येथे राहणारे फिर्यादी नबीउल्लाह हमीदउल्लाह चौधरी यांच्या तीन महिन्यांच्या बालकाला १८ फेब्रुवारीला मेव्हण्याची पत्नी किताबुन निशा चौधरी हिने खेळवण्यासाठी बाहेर घेऊन जाते, असे सांगून पळवून नेले होते. याबाबत मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेचा तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी मुसळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील सह पोलिस निरीक्षक सावंत यांनी तपास सुरू केला. महिला बिहारमध्ये असल्याचे कळताच तेथे जाऊन तिला अटक केली. या महिलेचे लग्न झालेले असून, तिला तीन अपत्ये आहेत. तिचे एका पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. तिला प्रियकरासोबत नव्याने संसार करावयाचा होता. म्हणून तिने लग्न झाल्याची व तीन अपत्यांची माहिती प्रियकरास सांगितले नव्हती. महिलेने प्रेमसंबंधातून ती प्रियकरापासून गरोदर असल्याची खोटी माहिती प्रियकरास फोनद्वारे कळवली. पुढे नणंदेचे तीन महिन्यांचे बालक हे आपलेच असल्याचे ती प्रियकरास व्हिडिओ कॉलद्वारे भासवत होती. त्यातून ती बालकाचे अपहरण केले व बिहारला निघून गेली होती, अशी माहिती तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवार (ता. ९) सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर केले असता तिला वसई न्यायालयाने १४ दिवसांची न्यालयीन कोठडी सुनावली आहे.
...
असा घडला गुन्हा
आरोपी महिला ही एक वर्षापूर्वी मुंबईच्या वडाळा परिसरात राहत होती. याच ठिकाणी तिचे एका १८ वर्षांच्या बिहारी मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते. तिला तीन मुले आहेत, हे तिने प्रियकरापासून लपवून ठेवले होते. ही घटना पतीला कळल्यानंतर त्याने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. ती ऐकत नसल्याने शेवटी पतीने पूर्ण कुटुंबासह वडाळा हा परिसर सोडून मांडवी हद्दीतील नालेश्वरनगरमध्ये आपल्या बहिणीकडे बस्तान हलवले. मुलगा त्याच्या मूळ गावी बिहारला निघून गेला होता. त्याला धमकावल्यामुले त्याने १८ फेब्रुवारीला विरारमध्ये येऊन बाळासह महिलेला आपल्या घरी नेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

