रिक्षाचालकांच्या हल्ल्यात बस कर्मचारी जखमी
रिक्षाचालकांच्या हल्ल्यात बस कर्मचारी जखमी
बोईसरमधील घटना; गुन्हा नोंद
तारापूर, ता. १० (बातमीदार) ः भररस्त्यात रिक्षामुळे एसटी बसला अडथळा आणला म्हणून जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना बोईसर रेल्वे स्थानक परिसरात घडली. मारहाणीत एसटी बसचे चालक आणि वाहक जखमी झाले असून, याप्रकरणी तीन रिक्षाचालकांवर बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बोईसरवरून मुरबे येथे जाणारी एसटी बस रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बोईसर रेल्वे स्थानकसमोरील रस्त्यावर पोहोचली असता प्रमोद अलगूसिंग याने आपली रिक्षा बससमोर आणून उभी करीत बसला पुढे जाण्यास अडथळा निर्माण केला. बसचालकाने रिक्षा बाजूला करण्याबाबत विंनती केली असता वाद निर्माण होऊन बसचे चालक-वाहक आणि रिक्षाचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. रिक्षाचालकांनी केलेल्या हल्ल्यात बसचे चालक मनोज हरनासे आणि वाहक रावसाहेब वाघ हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आणि वाहतूक कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली; मात्र या हाणामारीमुळे ऐन गर्दीच्या वेळेस बोईसर स्थानक रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे हाल झाले. बस कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी रिक्षाचालक प्रमोद अलगूसिंग, संजय यादव आणि एक अनोळखी रिक्षाचालक, अशा एकूण तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

