जागतिक महिला दिनाचा विशेष कार्यक्रम
जागतिक महिलादिनाचा विशेष कार्यक्रम
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : महिला सशक्तीकरणाचा संदेश देत जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्व शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून मनोरंजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक नीलेश शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात उद्योजक विनायक पोटे आणि पालिकेचे महिला व बालकल्याण विभाग समाजविकास अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी उपस्थित महिलांना उद्योग क्षेत्रातील संधींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा, कोणते लघुउद्योग फायदेशीर ठरू शकतात, याबाबत उपयुक्त माहिती दिली. महिला सन्मानाचा एक भाग म्हणून हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला होता. तसेच मनोरंजन कार्यक्रमातून उपस्थित महिलांनी आनंद घेतला.
उपस्थित सर्व माता-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांमुळे हा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. स्त्रीशक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या अशाच उपक्रमांसाठी सदैव कार्यरत राहू, अशी ग्वाही शिवसेना शहर प्रमुख नीलेश शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या विजया पोटे, जिल्हा प्रमुख छाया वाघमारे, उपजिल्हासंघटक माधुरी काळे, उपशहरप्रमुख राजवंती मढवी- शेट्टी, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, सारिका जाधव, शोभा पावशे, उपजिल्हासंघटक राधिका गुप्ते, महिला शहरप्रमुख पुष्पा ठाकरे, माजी सरपंच रीना ढोणे यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

