होळी स्पेशल! मध्य रेल्वेच्या आणखी ३४ होळी विशेष गाड्या !
मध्य रेल्वे मार्गावर
३४ होळी विशेष गाड्या
कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी, पनवेलवरून गाड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ३४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी - मडगाव, पनवेल-मडगाव, तसेच पुणे-दानापूर-पुणे मार्गावरही विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. तसेच मुंबई-बनारस, मऊ, दानापूर, मडगाव, पुणे-हिसार, दानापूर, मालदा टाउन आणि कलबुर्गी-बेंगळुरू या मार्गांवर विशेष गाड्या धावणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी-मडगाव या मार्गावर ट्रेन क्रमांक ०११०३ ही गाडी १७ व २४ मार्चला सकाळी ८.२० वाजता एलटीटीहून सुटेल, तर ट्रेन क्रमांक ०११०४ ही गाडी १६ व २३ मार्चला दुपारी ४.३० वाजता मडगावहून सुटेल. पनवेल-मडगाव-पनवेल मार्गावर ट्रेन क्रमांक ०११०१ ही गाडी १५ व २२ मार्चला सायंकाळी ६.२० वाजता पनवेलहून सुटेल, तर परतीची ट्रेन क्रमांक ०११०२ ही गाडी १५ व २२ मार्चला सकाळी ८.०० वाजता मडगावहून सुटेल. याशिवाय पनवेल-चिपळूण मार्गावर आठ अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१०१७ ही गाडी १३ ते १६ मार्चदरम्यान रात्री ९.१० वाजता पनवेलहून सुटेल, तर ट्रेन क्रमांक ०१०१८ ही गाडी १३ ते १६ मार्चदरम्यान दुपारी ३.२५ वाजता चिपळूणहून सुटेल. पुणे-दानापूर-पुणे मार्गावरही दोन विशेष गाड्या धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१४१९ ही गाडी ११ मार्चला सायंकाळी ७.५५ वाजता पुण्याहून सुटेल. परतीची ट्रेन क्रमांक ०१४२० ही गाडी १३ मार्चला पहाटे ६.३० वाजता दानापूरहून सुटेल. या गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
----
अन्य मार्गावरील गाड्या
सीएसएमटी-बनारस मार्गावर ट्रेन क्रमांक ०१०१३ ही गाडी गुरुवारी (ता. १३) रात्री १०.३० वाजता सीएसएमटी येथून सुटेल. परतीच्या मार्गावर ट्रेन क्रमांक ०१०१४ ही विशेष गाडी शनिवारी (ता.१५) सकाळी ८ वाजता बनारसहून सुटेल. सीएसएमटी-मऊ-सीएसएमटी मार्गावर ट्रेन क्रमांक ०१०१५ ही गाडी बुधवारी (ता. १२) रात्री १०.३० वाजता सीएसएमटीहून सुटेल. ट्रेन क्रमांक ०१०१६ ही विशेष गाडी शुक्रवारी (ता. १४) रोजी सायंकाळी ५ वाजता मऊहून सुटेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

