राज्याच्या विजेच्या मागणीने ३० हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला

राज्याच्या विजेच्या मागणीने ३० हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला
Published on

विजेची उच्चांकी मागणी
आतापर्यंतची सर्वाधिक ३० हजार मेगावॉटची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यात उष्णतेची लाट आली असून, तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे बसणारे चटके आणि उकाड्यापासून सुटका व्हावी, म्हणून मुंबईकरांसह राज्यभरातील ग्राहकांकडून एसी, पंखे, कूलरचा वापर वाढला आहे. त्यामुळे सोमवारी (ता. १०) दुपारी चारच्या सुमारास राज्याच्या विजेच्या मागणीने रेकाॅर्डब्रेक टप्पा गाठला असून, तब्बल ३० हजार २२९ मेगावाॅट एवढी नोंदली आहे. आतापर्यंतची विजेची ही सर्वाधिक मागणी ठरली आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. तसेच उष्णतेची लाटही जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ४ फेब्रुवारी रोजी राज्यात सर्वाधिक २९ हजार ९१८ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली होती. त्यानंतर सोमवारी विजेची मागणी ३० हजार २२९ मेगावाॅटवर पोहोचली आहे. दरम्यान, आजच्या एकूण विक्रमी मागणीत महावितरणकडे २६ हजार ६९८ मेगावाॅट, तर मुंबईतील वीज कंपन्यांकडे ३५३१ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात विजेची मागणी ३१ हजार मेगावाॅटच्या पुढे जाईल, असा वीजतज्ज्ञांचा अंदाज आहे.
---
वीज कुठून उपलब्ध झाली?
राज्याची विजेची विक्रमी मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने महानिर्मितीकडून सुमारे सात हजार ९२४ मेगावाॅट, खासगी प्रकल्पातून १० हजार ५५ मेगावाॅट, केंद्रीय प्रकल्प आणि पॉवरग्रीडमधून आठ हजार ८०० मेगावाॅट वीज घेतली आहे, तर मुंबईतील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पाॅवरकडून ६६२ मेगावाॅट, अदाणीकडून ४९३ मेगावाॅट आणि एक्स्चेंजमधून दोन हजार ३७६ मेगावाॅट वीज घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com