नियोजित कामामुळे आठवडाभर वीज भारनियमन

नियोजित कामामुळे आठवडाभर वीज भारनियमन
Published on

नियोजित कामामुळे आठवडाभर वीज भारनियमन
उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : महावितरण कंपनीच्या नियोजनानुसार ११ ते १८ मार्च २०२५ दरम्यान २००/२२ केव्ही इएचव्ही उपकेंद्र आनंदनगर येथे ५० एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शहरातील वीजपुरवठा अधिक स्थिर व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे; मात्र या कालावधीत आवश्यकतेनुसार वीज भारनियमन करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणतर्फे नियोजित कामादरम्यान उल्हासनगर ४ व ५ उपविभाग तसेच बदलापूर भागातील वीजभाराचे नियमन करण्यात येईल. प्रामुख्याने औद्योगिक ग्राहकांचे भारनियमन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर भारनियमन करावे लागल्यास ते आवश्यकतेनुसार केले जाणार आहे. ६०० ए वीज भार नियमन उल्हासनगर विभाग-२ व ६०० ए वीज भार नियमन बदलापूर विभागाकडून नियंत्रित केले जाणार आहे. भारनियमनाचे नियंत्रण संयुक्त पद्धतीने विशेष नियंत्रण कक्षामार्फत केले जाईल, जेणेकरून ग्राहकांना कमी त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी हे नियोजित काम अत्यावश्यक आहे. ग्राहकांनी समजूतदारपणे या तात्पुरत्या गैरसोयीचा स्वीकार करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com