मुरबाडच्या आजीबाईंनी शाळेच्या सुट्टी दिवशी घेतला दर्शनाचा लाभ!

मुरबाडच्या आजीबाईंनी शाळेच्या सुट्टी दिवशी घेतला दर्शनाचा लाभ!
Published on

आत्मिक समाधानाची अनुभूती
‘भेटी लागी जीवा लागलिसे आस’ अशी ओढ मनात ठेवून आलेल्या हजारो भाविकांमध्ये ‘धन्य आजि दिन झाले संतांचे दर्शन... अनंत जन्मांचा शीण गेला’ अशीच भावना दाटून आली होती. वरळीच्या एनएससीआय डोममध्ये संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने आलेले भाविक दोन दिवस गुरूभक्तीत लीन झाले होते. एका वेगळ्याच आत्मिक समाधानाची अनुभूती ते घेत होते. एकाच वेळी २१ संत व सद्‍गुरूंच्या पादुकांवर नतमस्तक होण्याचा योग घडून आल्याने भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम मुंबईत पाहायला मिळाला. ‘सकाळ’तर्फे आयोजित अभूतपूर्व अशा श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात भाविकांच्या अलोट गर्दीमुळे फुललेला भक्तीचा मळा एक नवा अध्याय लिहून गेला.

मुरबाडच्या आजीबाईंनी शाळेच्या सुट्टी दिवशी घेतला दर्शनाचा लाभ

मुरबाड फांगणे गावात भरणाऱ्या आजीबाईंच्या शाळेतील आजींनी पादुका दर्शन सोहळ्याची अनुभूती घेत दर्शन घेतले. या सगळ्या आजीबाईंमध्ये ज्येष्ठ असणाऱ्या ८० वर्षांच्या निर्मलाबाई यादेखील सहभागी झाल्या. फांगणे गावातून कल्याण आणि कल्याण ते इथे असा प्रवास करत सकाळीच प्रवासाला निघालेल्या आजीबाईंचा थकवा पादुका दर्शन सोहळ्याला भेट देताच निघून गेला. सोहळा सुरू असलेल्या रिंगण, भजन, फुगड्या सारं पाहून आजीबाई दंग झाल्या होत्या. या वेळी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आजीबाईंच्या शाळेतील या आजींचा व व्यवस्थापक योगेंद्र बांगर यांचा सन्मानदेखील करण्यात आला. आम्ही ग्रामीण भागात राहतो. देवदर्शन करण्यासाठी आर्थिक आणि शारीरिक बाबींनी आम्हाला अडचणी येत असतात, मात्र या सोहळ्यामुळे आम्हाला आंतरिक समाधान लाभल्याची प्रतिक्रिया योगेंद्र बांगर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com