अंधेरी दुर्घटनेतील जखमीचा मृत्यू

अंधेरी दुर्घटनेतील 
जखमीचा मृत्यू
Published on

अंधेरी दुर्घटनेतील
जखमीचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीमध्ये शनिवारी मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध असलेली महानगर गॅस पाइपलाइन फुटून लागलेल्या आगीतील जखमीचा सोमवारी (ता. १०) मृत्यू झाला. अमन हरिशंकर सरोज (२२) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, दोघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.

पाइपलाइन फुटल्यानंतर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात रस्त्यावर असलेला रिक्षाचालक आणि दोन दुचाकीस्वार असे तिघे जण जखमी झाले होते. जखमींना तातडीने जोगेश्‍वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरेश गुप्ता (५२) हे रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अरविंदकुमार कैथाल (२१) आणि अमन सरोज (२२) हे दुचाकीस्वार प्रत्येकी ५० टक्के भाजले होते. यातील सरोज यांचा मृत्यू झाला आहे. कॉलनीत कोणतीही परवानगी न घेता जेसीबीमार्फत केलेल्या खोदकामाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून, तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com