अपारंपरिक ऊर्जाक्षमता २० टक्क्यांनी वाढली
अपारंपरिक ऊर्जाक्षमता
२० टक्क्यांनी वाढली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त अपारंपरिक वीज प्रकल्प उभारण्यासाठी ऊर्जा विभागाकडून भर दिला जात आहे. त्यानुसार दोन वर्षांत राज्याची अपारंपरिक म्हणजेच सौर, पवन, जलविद्युत वीजनिर्मिती क्षमतेत तब्बल २,१६२ मेगावॉटची भर पडली आहे. एकूण वीजनिर्मिती क्षमतेत २० टक्के भर पडली आहे. त्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, पीएम सूर्यघर योजनांच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे.
भविष्यातील विजेच्या मागणीचा विचार करून राज्य सरकार औष्णिक, अणुऊर्जा प्रकल्प, सौर, पवन, जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीवर भर देत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्यातील अपारंपरिक वीज प्रकल्पांची वीज निर्मिती क्षमता ११ हजार ४७६ एवढी होती. ती १३ हजार ६५८ मेगावॉट एवढी झाली आहे. तसेच अनेक सौर प्रकल्पाचे काम सुरू असल्याने पुढील दोन वर्षांत हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असे ऊर्जा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

