दोन विकसकांच्‍या मालमत्ता जप्त

दोन विकसकांच्‍या मालमत्ता जप्त
Published on

दोन विकसकांच्‍या मालमत्ता जप्त

मालमत्ता कर थकबाकीदारांवर पालिकेची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने जप्‍ती, लिलावाची धडक कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिकेच्‍या करनिर्धारण आणि संकलन खात्‍याने सोमवारी (ता. १०) दोन मालमत्तांवर जप्‍ती आणि अटकावणीची कारवाई केली. यात दोन खासगी विकसकांच्‍या मालमत्तांचा समावेश आहे.

भूखंड मालमत्ता करापोटी एक चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) प्रमाणे या दोन थकबाकीदार आस्‍थापनांकडे दंड रकमेसह एकूण २१ कोटी ६३ लाख ५६ हजार ८६७ रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांनी २१ दिवसांत करभरणा न केल्‍याने ही कारवाई करण्‍यात आली. भूखंड आणि निवासी-व्‍यावसायिक इमारती, व्‍यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींवर ही कारवाई सुरू केली आहे.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी,असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
......
अशी झाली कारवाई
माझगाव (ई विभाग) येथे सुमेर बिल्‍ट कार्पोरेशन प्रायव्‍हेट लिमिटेड यांचा भूखंड आहे. या भूखंडाच्‍या करापोटी कर निर्धारण व संकलन विभागाने ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मागणीपत्र जारी केले होते. २१ दिवसांत करभरणा न केल्‍यामुळे जप्‍ती आणि अटकावणीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यांच्याकडे १८ कोटी एक लाख ३६ हजार १६४ रुपयांचा कर थकला आहे. तसेच मुलुंड (टी विभाग) येथील गव्‍हाणपाडा गाव येथे आर. आर. डेव्‍हलपर्स यांच्‍या नावे भूखंड आहे. भूखंडाच्‍या करापोटी ३० एप्रिल २०२४ रोजी मागणीपत्र जारी केले होते. त्यांच्यावरही कर थकवल्याने कारवाई केली. त्यांच्याकडे तीन कोटी ६२ लाख २० हजार ७०३ रुपयांचा कर थकला आहे. हा कर न भरल्यास भूखंड लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्‍यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com