

अल्पवयीन मुलींना त्रास देणाऱ्यावर गुन्हा दाखल
टिटवाळा, ता. १० : (वार्ताहर) ः येथे एका १४ वर्षीय मुलीने तिच्या आणि तिच्या १२ वर्षीय मावस बहिणीच्या मनास लज्जा उत्पन्न करण्यात आल्याबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही तिच्या आईसोबत राहते. तिची आई एका कपड्यांच्या दुकानात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्याच परिसरात रोहित पवार यांचे ‘एकविरा चायनीज’ नावाचे दुकान असून, त्याचा भाऊ हेमंत पवार हा त्या दुकानात ये-जा करीत असल्याने फिर्यादी मुलगी त्याला ओळखते. तक्रारीनुसार, मागील काही दिवसांपासून हेमंत पवार हा शाळेत जाताना तिच्या मागे येत होता. ९ मार्चला सायंकाळी ७:३० वाजता फिर्यादी घरी एकटी असताना हेमंत पवार तिच्या घरात शिरला आणि तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार करताच त्याने तिच्या १२ वर्षीय मावस बहिणीच्या खांद्यावर हात ठेवत तिलाही अशाच प्रकारे त्रास दिला आणि तिला किचनमध्ये ओढून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास शाळेतून उचलून नेण्याची धमकीही दिली. घाबरलेल्या मुलीने तिची आई घरी आल्यानंतर संपूर्ण प्रकार तिला सांगितला. त्यानंतर आईसह पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी हेमंत पवारविरोधात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास चालू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.