धारावीतील ११ उमेदवार महानगरमध्ये  रुजू

धारावीतील ११ उमेदवार महानगरमध्ये रुजू

Published on

धारावीतील ११ उमेदवार महानगरमध्ये रुजू
डीएसएमच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत मिळालेले प्रशिक्षण कामी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : धारावीकरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी त्यांना विशेष कौशल्य विकासाचे प्रशिक्षण धारावी सोशल मिशनकडून (डीएसएम) दिले जात असून, त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. डीएसएमने ‘डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’च्या (डीबीआयटीआय) सहकार्याने धारावीतील युवकांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. या उपक्रमात ‘गॅस पाइपलाइन फिटर’चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या धारावीतील ११ उमेदवारांना थेट महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)मध्ये कायमची नोकरी मिळाली असून, त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
धारावीतील तरुणांसाठी डीएसएमने डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी अखेरपर्यंत विशेष कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केले होते. या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान एकूण २१ प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकांसह थेट इंडस्ट्रियल ट्रेनिंगची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना पाच हजार रुपयांचे मासिक विद्यावेतन देण्यात आले होते. आता त्यांची एमजीएलमध्ये नेमणूक झाल्याने संबंधितांना मासिक १५ हजार रुपये वेतन मिळणार आहे. गॅस पाइपलाइन फिटिंगच्या क्षेत्रात काम करण्याचा कधी विचारही केला नव्हता, मात्र डीएसएमच्या माध्यमातून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे मला वेगळा आत्मविश्वास मिळाला. त्यामुळेच मी ही नोकरी मिळवू शकले, अशी भावना सोनाली रमेश या तरुणीने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com