बँक अधिकाऱ्याला ७५ लाखांचा गंडा
बँक अधिकाऱ्याला ७५ लाखांचा गंडा
पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
अंधेरी, ता. १२ (बातमीदार) ः गुंतवणुकीच्या नावाने एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुमारे ७५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दीपंकर सुरेश हलदर आणि अंजना दीपंकर हलदर अशी या दोघांची नावे असून ते हरियानाचे रहिवासी आहेत. दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. यातील तक्रारदार अंधेरीत असून एका नामांकित बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात. अहमदाबाद येथे मॅनेजमेंट कोर्स करताना त्यांची दीपंकरशी मैत्री झाली होती. काही वर्षांपूर्वी त्याने त्यांना कॉल करून त्याने स्वतःची कंपनी सुरू केली असून या कंपनीत त्यांना गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना दोन वर्षांनी बारा टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. दीपंकर हा त्यांचा चांगला मित्र असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ७५ लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता; मात्र दोन वर्षे उलटूनही त्याने परताव्याची रक्कम दिली नाही. विचारणा केल्यानंतर दीपंकर त्यांना टाळण्याचा प्रयत्न करीत होता. नंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. दीपंकरने व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने अनेकांना प्रवृत्त केले होते. आकर्षक परतावा देतो, असे सांगून कोणालाही मूळ रकमेसह परतावा रक्कम दिली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असून या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

