

दोन कारागिरांकडून मंदिराच्या चांदीचा अपहार
खार येथील घटना; कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल
अंधेरी (बातमीदार) ः मंदिराच्या फर्निचरसह दरवाजासाठी दिलेल्या सुमारे ४५ लाखांचा शुद्ध चांदीचा दोन कारागिरांनी अपहार केला. अल्पेश मिस्त्री आणि समीर मिस्त्री अशी या दोघांची नावे आहेत. दोन्ही कारागीर पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी खार पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. खार परिसरात एक लक्ष्मीनारायण मंदिर असून तक्रारदार याच मंदिरात ट्रस्टी म्हणून काम करतात. मार्च २०२३ रोजी त्यांनी अल्पेश आणि समीर यांना ४५ लाख ५० हजार रुपयांची ९१ किलो शुद्ध चांदी दिली होती. या चांदीचे मंदिरासाठी काही फर्निचर आणि दरवाजा बनविण्यास सांगण्यात आले होते. तीन महिन्यांत ते काम करून त्यांच्याकडून फर्निचर आणि दरवाजा बनवून मिळणार होते; मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी चांदीचे फर्निचर आणि दरवाजा बनवून दिला नाही. विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता. ते दोघेही त्यांच्या मालाड येथील घरातून निघून गेले होते. या दोघांनी नंतर त्यांचे मोबाईल बंद केले होते. हा प्रकार लक्षात येताच खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अल्पेश आणि समीर मिस्त्री या दोन्ही कारागिरांविरुद्ध पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
RAJU PARULEKAR
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.