दृष्टिहीन मुलांसाठी विशेष होळी उत्सव

दृष्टिहीन मुलांसाठी विशेष होळी उत्सव
Published on

दृष्टिहीन मुलांसाठी विशेष होळी उत्सव
आधारिका फाउंडेशनचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : होळी सणाच्या रंगांच्या उधळणीत दृष्टिहीन मुलांनाही सहभागी होता यावे, यासाठी मुंबईच्या आधारिका फाउंडेशनने पुढाकार घेतला असून त्यांच्यासाठी विशेष होळी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यांच्या आयुष्यातला अंधकार दूर करता येत नसला तरी ते पर्यावरणपूरक आणि सर्वसामान्यांसारखी होळी साजरी करू शकतात, हाच या उत्सवाचा उद्देश आहे.
मुंबईत पहिल्यांदाच दिव्यदृष्टी मित्रांसाठी विशेष होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव धूलिवंदनाच्या दिवशी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडणार आहे. सुरक्षित वातावरणात हा सोहळा पार पडावा, यासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. सेंद्रिय रंग, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि स्पर्शाद्वारे अनुभवण्यासारखे रंग, पिचकारी, संगीताच्या तालावर ऊर्जा आणि उत्साह अनुभवण्यासाठी डीजे बॅश, पाणी फवारणी, सुरक्षिततेची विशेष काळजी म्हणून सुरक्षा गॉगल्स ठेवले जाणार आहेत.
होळी हा केवळ रंगांचा सण नसून समतेचा, आनंदाचा आणि एकत्रिततेचा सण आहे, असे आधारिका फाउंडेशनचे संस्थापक विनायक मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com