जे. जे.  रुग्णालयात चाचण्या होणार अधिक वेगवान

जे. जे. रुग्णालयात चाचण्या होणार अधिक वेगवान

Published on

जे.जे. रुग्णालयात चाचण्या होणार अधिक वेगवान
एका तासात २,८०० चाचण्या करणे शक्य; बायोकेमिस्ट्री ॲनालायझरचा होणार वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या अधिक वेगवान होणार आहेत. बायोकेमिस्ट्री ॲनालायझरचा वापर होणार असून जीआयसी हाउसिंग फायनान्स आणि रोटरी क्लबने सीएसआरअंतर्गत हा उपक्रम राबवला आहे. आरोग्यसेवा क्षेत्राच्या माध्यमातून सुविधांना चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत दोन्ही संस्थांनी जे.जे. रुग्णालयातील बायोकेमिस्ट्री विभागाला ऑटोमेटेड ॲनालायझर भेट म्हणून देण्यात आला आहे. निदान प्रक्रियेची अचूकता आणि कार्यक्षमता वाढवणे, तसेच हजारो रुग्णांना फायदा मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हा एक अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ॲनालायझर आहे, जो प्रतितास २,८०० चाचण्या करू शकतो. त्यात दोन हजार केमिस्ट्री आणि ८०० इलेक्ट्रोलाइट चाचण्या समाविष्ट आहेत. उच्च कार्यक्षमता, अचूकता आणि वेग यामुळे हे उपकरण बायोकेमिस्ट्री विभागासाठी फायदेशीर ठरणार आहे. आतापर्यंत जे.जे. रुग्णालयातील चाचण्या बाहेरील खासगी प्रयोगशाळांना पाठवल्या जातात, असा आरोप होत होता. खासगी प्रयोगशाळांचे दलाल रुग्णालयात वावरत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. या विषयावरून जे.जे. रुग्णालय कायम चर्चेत होते. या सहकार्यामुळे रुग्णालयातील निदान सेवांना अधिक बळकटी मिळेल. त्‍यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना अचूक आणि वेगवान निदान समजेल.
रोटरी क्लबचे डॉ. बाळ इनामदार यांनी सांगितले, की सीएसआर उपक्रम आणि आरोग्यसेवा यांच्यातील अंतर भरून काढण्यासाठी आमचा क्लब नेहमीच पुढाकार घेतो. हे योगदान समाजासाठी महत्त्वाचे आहे.
नवीन ॲनालायझर रुटीन बायोकेमिस्ट्री चाचण्या, विशेष प्रथिन चाचण्या, उपचारात्मक औषध निरीक्षण आणि युरीनमध्ये ड्रग्ज ऑफ अब्युझ शोधण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, ज्यामुळे निदानाची अचूकता आणि कार्यक्षमता आणखी वाढेल.

या ॲनायलायझरमुळे जे.जे.तील चाचण्या रुग्णालयातच होतील. त्यामुळे रुग्णांनाही परवडणाऱ्या दरात चाचण्यांचे अहवाल तत्काळ प्राप्त होतील. यासह निदान प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होईल.
- डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता,
जे.जे. समूह रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com