बेवारस वाहने क्षेपणभूमीत टाका
वाशी, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर बेवारस असणाऱ्या वाहनांमुळे तसेच पदथांवरील फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करून ती क्षेपणभूमीत जमा करा व फेरीवाल्यांवरदेखील कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी अतिक्रमण विभाग व विभाग कार्यालये यांना दिले आहेत.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना महापालिका कार्यक्षेत्रात उभ्या असलेल्या बेवारस वाहनांना महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९मधील कलम २३० व २३१ अन्वये विभाग कार्यालयांमार्फत सूचनापत्रक बजावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही बेवारस वाहने त्यांच्या मालकांनी स्वत:हून काढून टाकण्याबाबत अथवा हटविण्याबाबत रिक्षांद्वारे ध्वनिक्षेपकामार्फत जनजागृतीपर सूचना करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. या सूचनापत्रकांचा कालावधी संपुष्टात येताच संबंधित विभाग कार्यालयामार्फत ही बेवारस वाहने जप्त करून टोइंगच्या साह्याने क्षेपणभूमी येथे जमा करावीत व त्यावर नियमानुसार पुढील कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय पदपथावर व्यवसाय करून रहदारीस अडथळा आणणाऱ्या अनधिकृत फेरीवाले व विक्रेते यांच्या विरोधातही तीव्र स्वरूपात मोहीम राबविण्यात येणार आहे.
------------------
नवी मुंबई शहराचा सुनियोजित, आधुनिक शहर हा नावलौकिक आहे. त्याला बाधा पोहोचविणाऱ्या अनधिकृत घटकांविरोधातील ही मोहीम आहे. रस्ते, पदपथ यांचा नागरिकांना सुयोग्य उपयोग करता यावा, या दृष्टीने कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

