ऐरोलीमध्ये महिलांचा सन्मान
वाशी, ता. १२ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ममीत चौगुले युवा प्रतिष्ठानच्या वतीने ऐरोली सेक्टर १० येथील डी. ए. व्ही शाळेच्या प्रांगणात माजी नगरसेवक ममित चौगुले व समाजसेविका रेश्मा चौगुले यांच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी वाद्यवृंद कार्यक्रमासह लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसेदेखील ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमास ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले, अभिनेत्री सई मांजरेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महिलांचा सन्मान हा ३६५ दिवस करणे गरजेचे आहे. शिवसेना ही नेहमीच महिलांचा सन्मान करत असते. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

